Tarun Bharat

रूट, ओली यांची चमक

Advertisements

वृत्तसंस्था/ पार्ल, दक्षिण आफ्रिका

येथील बोलँड पार्कवर झालेल्या इंग्लंडच्या अंतरसंघ टी-20 सराव सामन्यात वेगवान गोलंदाज ओली स्टोन व कसोटी कर्णधार जो रूट यांनी चमकदार प्रदर्शन घडविले.

स्टोन व रूट हे इंग्लंडच्या टी-20 संघात नसले तरी ते वनडे संघातून खेळणार आहेत. इंग्लंड-द.आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका झाल्यानंतर तीन वनडे सामने खेळविले जाणार आहेत. येत्या शुक्रवारपासून केपटाऊनमध्ये टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

टीम मॉर्गन व टीम बटलर यांच्यात झालेल्या सराव सामन्यात स्टोनने 12 धावांत 3 बळी मिळविताना जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले. मॉर्गनच्या संघाने 20 षटकांत 9 बाद 139 धावा जमविल्या. त्यानंतर रूट व अष्टपैलू सॅम करन यांनी प्रत्येकी नाबाद 45 धावा जमवित बटलर संघाला 7.2 षटके बाकी ठेवत 6 गडय़ांनी विजय मिळवून दिला. याआधी झालेल्या 40 षटकांच्या सराव सामन्यातही रूटने 77 धावा जमविल्या होत्या.

Related Stories

साक्षी, मीराबाईला ‘अर्जुन’ यादीतून वगळले

Patil_p

इगा स्वायटेक-ऑन्स जेबॉर अंतिम फेरीत

Patil_p

आशिया चषकासाठी महिला संघ जाहीर

Patil_p

राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय टेबल टेनिसपटूंचे पुनरागमन

Patil_p

अर्जेन्टिना दौऱयात भारताची विजयी सुरुवात

Patil_p

महिला मल्लांसाठी सराव शिबीर लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!