Tarun Bharat

रॅलीमधून ‘फिट इंडिया’चा संदेश

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

‘फिट इंडिया’बाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, पेरणा पी. यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्केटिंग, सायकलिंग व रनिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव-जांबोटी- बेळगाव अशी 70 कि.मी. रॅली काढण्यात आली. सीआरपीएफच्या कोब्रा स्कूलचे सेकंड कमांडर गौरव कुमार यांनी झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.

गोवावेस येथील जलतरण तलावापासून या रॅलीला सुरुवात झाली. पहिले रेल्वेगेट, तिसरे रेल्वेगेट, पिरनवाडी, मच्छे, किणये, जांबोटी असा प्रवास करण्यात आला. यामध्ये एकूण 45 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये 14 स्केटर्स, 15 सायकलपटू, 11 रनर्स व 7 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नियोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रशिक्षक उमेश कलघटगी म्हणाले, तंदुरुस्त बेळगाव बनविण्यासाठीचा हा एक छोटा उपक्रम आहे. कोरोनाच्या काळात ज्यांचे आरोग्य चांगले राहिले त्यांना कोणताही धोका झाला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी प्रेरणा पी. यु. कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक गिरीष दंडण्णावर, अशोक काडापुरे, जगत शंकरगौडा, जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, ऍड. कमलकिशोर जोशी, डी. बी. पाटील, रघुराम, राजू माळवदे, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

क्वारंटाईनमधील नागरिकांची संख्या वाढतीच

Patil_p

खानापूर येथे भव्य रॅली

Nilkanth Sonar

डीके लायन्स विजयी, लॉगर स्पोर्ट्सची एक्स्ट्रीमवर निसटती मात

Amit Kulkarni

खानापूर रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे

Amit Kulkarni

युवा समितीतर्फे येळ्ळूर मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

Amit Kulkarni

विणकरांचे 1 लाखापर्यंतचे कर्ज माफ

Patil_p
error: Content is protected !!