Tarun Bharat

रेकॉर्डब्रेक लसीकरणावरुन पी. चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे निमित्त साधून देशात रेकॉर्डब्रेक 88 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले. याच रेकॉर्ड संदर्भात एका ट्विट करत काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

  • मोदी है, मुमकिन है’…


चिदंबरम म्हणाले, रविवारी लसींची जमाखोरी, सोमवारी लसीकरणआणि पुढच्याच दिवशी ये रे पूर्वस्थिती… एका दिवसाच्या लसीकरणाच्या जागतिक रेकॉर्डमागचे हेच रहस्य आहे, असे म्हणत पी चिदंबरम यांनी केंद्राच्या लसीकरण नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 


पुढे ते म्हणाले, मला विश्वास आहे की या ‘कर्तृत्वाला’ गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जागा मिळेल’, असे म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली आहे. तर आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात की, ‘कुणाला माहीत, मेडिसीनचा नोबल पुरस्कार मोदी सरकारलाच दिला जाईल… मोदी है, मुमकिन है’ ला आता मोदी है तो चमत्कार है, असे म्हटले पाहिजे. 

  • लसीकरणाचा जागतिक रेकॉर्ड


देशात यावर्षीच्या शेवटपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. या अंतर्गत मंगळवारी दुसऱ्या दिवशी देशात 54 लाख 24 हजार 374 जणांचे लसीकरण झाले. याच बरोबर एकूण लसीकरणाने 29 कोटींचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी झालेल्या लसीकरणात या वयोगटातील 32 लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्वीटद्वारे दिली आहे.

Related Stories

‘स्पुतनिक लाइट’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी

datta jadhav

शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

Rohan_P

बीपीसीएल : सिलिंडरधारकांना मिळणार दिलासा

Patil_p

बंगाल हिंसाचार : मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई

Rohan_P

महिलांच्या नेतृत्वामुळे देशात परिवर्तन

Patil_p

केरळच्या संघ कार्यालयावर बॉम्ब हल्ला

Patil_p
error: Content is protected !!