Tarun Bharat

रेडक्रॉसतर्फे 20 बेडची ऑक्सिजन बँक सुरू

प्रतिनिधी / बेळगाव 

कोल्हापूर सर्कलजवळील माहेश्वरी अंध शाळेसमोर असलेल्या युथ हॉस्टेलमध्ये रेडक्रॉसच्यावतीने 20 बेडची ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. जोपर्यंत मोठय़ा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी ऑक्सिजन दिला जाणार आहे. याचा उपयोग रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावा, असे आवाहन रेडक्रॉसच्यावतीने करण्यात आले आहे.

रेडक्रॉसने एक चांगला उपक्रम सुरू केला असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी सर्व सुविधा मोफत राहणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रेडक्रॉसच्यावतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेडक्रॉसचे सचिव डॉ. मिसाळे, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स टीमचे समन्वयक एल. व्ही. श्रीनिवासन आणि प्रवीण आदी यावेळी उपस्थित होते.

या हॉस्टेलमध्ये 20 बेड तसेच 2 कॉन्सट्रेटर्स आहेत. ते सर्वांना मोफत दिले जाणार आहेत. 24 तास सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गणेशपूर येथे ओपीडी-व्हॅक्सिनेशन केंद्र

रेडक्रॉसने आजपर्यंत प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेतला आहे. या माध्यमातून गोरगरिबांना मदत करणे, उपचार करणे असे उपक्रम सातत्याने सुरू आहेत. गणेशपूर येथे यापूर्वीच ओपीडी आणि व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू केले आहे. 1700 हून अधिक जणांना आतापर्यंत व्हॅक्सिनेशन केले आहे. तेथेही मोठा प्रतिसाद असून ही सेवा नियमित ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

लोकमान्य ग्रंथालयात उद्या प्रा.कृष्णाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान

Amit Kulkarni

मोफत तपासणी शिबिर

Omkar B

मैदानी खेळातही घडवा ‘दंगल’

Amit Kulkarni

डॉ. रवी पाटील यांच्यासाठी धनंजय महाडिकांची मतयाचना

Amit Kulkarni

अनावश्यक ठिकाणी बॅरिकेड्स

Amit Kulkarni

शहर परिसरात मकरसंक्रांत उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!