Tarun Bharat

रेडी येथील नवविवाहितेचा प्रसुती पश्चात मृत्यू

सावंतवाडी:

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती पश्चात नवविवाहितेचा अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. सौ. स्नेहा नागेश भगत (29, रा. रेडी-कनयाळ) असे या नवविवाहितेचे नाव आहे. तिचे बाळ सुखरुप आहे. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे रेडी व वजराट गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेडी कनयाळ येथील सौ. स्नेहा नागेश भगत (पूर्वाश्रमीच्या नीलिमा लक्ष्मण मांजरेकर, वजराट-कासलेवाडी) हिला प्रसुतीसाठी सोमवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी पहाटे प्रसुती नॉर्मल होऊन तिने मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने ती कोमात गेली. स्त्राrरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर व त्यांच्या सहकाऱयांनी तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तिची प्राणज्योत मावळली. नीलिमा हिचा रेडी येथील नागेश भगत यांच्याशी गेल्यावर्षीच मे महिन्यात विवाह झाला होता. स्नेहाच्या मृत्यूमुळे सासर व माहेरच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेडी व वजराट येथील नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

या घटनेची माहिती स्नेहा हिचा भाऊ भद्रसेन मांजरेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. तात्काळ रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, नायब तहसीलदार प्रदीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, पोलीस हवालदार दर्शन सावंत, दीपक लोंढे यांनी रुग्णालयात धाव घेतली. स्नेहा भगत हिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून पंचनामा करण्यात आला. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. नेमके निदान होण्यासाठी व्हिसारा राखून ठेवण्यात आला आहे. अशी माहिती हवालदार दर्शन सावंत यांनी दिली.

Related Stories

कणकवलीत उड्डाण पुलाचा स्लॅब कोसळला

NIKHIL_N

जि. प. सदस्याचा आंदोलनाचा इशारा

NIKHIL_N

कार्यालयाच्या बाथरूमला तीन वर्ष लागत असतील तर इतर कामे काय करणार- आ. नाईक यांनी घेतली सा. बां. ची झाडाझडती

Anuja Kudatarkar

संशयित गोहत्या प्रकरणी तिघे 50 दिवसांनंतर गजाआड

Patil_p

रत्नागिरी जिल्हय़ातील कोविड मृत्यूदरात घट

Patil_p

जिह्यात कोरोनाचे तब्बल 155 नवे रूग्ण!

Patil_p