Tarun Bharat

रेनॉची नवी क्वीड बाजारात

मुंबई

 फ्रान्सच्या रेनॉ कंपनीने आपली आरएक्सएल क्वीड ही नवी मोटार नुकतीच बाजारात दाखल केली आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा प्रकारात दाखल झालेल्या या गाडीची किंमत अनुक्रमे 4 लाख 16000 रुपये, 4 लाख 48000 रुपये इतकी असणार आहे. कंपनीने या गाडीवर ‘खरेदी करा आत्ता आणि रक्कम भरा नंतर’ ही ऑफर सादर केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना ही नवी कार लगेच खरेदी करता येईल आणि तीन महिन्यानंतर समान मासिक हप्ते ग्राहकाला भरण्याची संधी असणार आहे. बीएस-6 श्रेणीसह येणाऱया या गाडीवर अतिरिक्त 5 वर्षाची वॉरंटी कंपनीने देऊ केली आहे. ही गाडी आईस कूल व्हाईट, मूनलाईट सिल्वर, इलेक्ट्रीक ब्ल्यू यासह 6 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Related Stories

उडान योजनेची गती मंदावली

Patil_p

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

tarunbharat

व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केला कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर 

prashant_c

हय़ुंडाईची इलेक्ट्रिक ‘आयोनिक 5’ लवकरच

Patil_p

एफडीआयच्या इक्विटीत 14 टक्क्यांची घसरण

Amit Kulkarni

टाटा मोटर्सची ‘इंडिया की दुसरी दिवाली’ मोहिम

Omkar B