Tarun Bharat

रेनॉच्या किगरला वाढती पसंदी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी रेनॉने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला प्रारंभ केला असून या अंतर्गत सुव्ह गटातील किगर या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गाडीला पहिल्याच दिवशी 1100 ग्राहकांनी मागणी नोंदविली आहे. हा एक प्रकारचा विक्रमच असल्याचे रेनॉकडून सांगण्यात आले. कंपनीच्या विक्रेत्यांमार्फत सदरच्या गाडीचे बुकींग ग्राहकांना करता येणार आहे. अंदाजे 500 विक्री केंद्रांमार्फत तसेच संकेतस्थळावरून सदरची गाडी बुक करण्याची संधी ग्राहकांना असणार आहे. कंपनीने पहिल्याच दिवशी 1100 किगर वाहनाचे वितरण ग्राहकांना केले आहे. यावरुनच किगरची लोकप्रियता भारतीयांमध्ये सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होत आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ व्यंकटराम ममीलपल्ले यांनी सांगितले. याआधी याच गटातील डस्टर या गाडीला ग्राहकांनी खूप पसंदी दर्शविली होती. भारतासह जगभरात या गाडीचे चाहते अधिक असल्याचा कंपनीला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

टाटा मोटर्सची 1 लाखावी अल्ट्रोज दाखल

Patil_p

भारतातून होणाऱया कार निर्यातीत घट

Patil_p

टियागोला बुकिंगमध्ये जोरदार प्रतिसाद

Patil_p

अदानी एंटरप्रायझेसच्या निव्वळ नफ्यात घट

Patil_p

‘सुप्रोप्रॉफिट ट्रक’ची श्रेणी सादर

Amit Kulkarni

लक्झरी कार उत्पादन 2022 मध्ये विक्रमी टप्पा गाठणार

Patil_p