Tarun Bharat

रेबीजबाबत शहर-ग्रामीण भागात जागृती

Advertisements

पशु संगोपनतर्फे शाळा-महाविद्यालय व इतर ठिकाणी जागृती

बेळगाव / प्रतिनिधी

रेबीजबाबत जनमाणसात जागृती करण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत रेबीज जागृती पंधरवडा साजरा होत आहे. या निमित्ताने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना रेबीजबाबत माहिती दिली जात आहे. शिवाय शहर आणि ग्रामीण भागातदेखील ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून रेबीजबाबत जनजागृती केली जात आहे.

अलीकडे भटक्मया आणि पाळीव कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरात 20 हजारहून अधिक भटकी कुत्री आहेत. दरवषी यामध्ये भर पडत आहे. दरम्यान, कुत्र्याने माणसावर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण होते. यासाठी खबरदारी म्हणून रेबीज लस घेणे आवश्यक आहे. यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत जागृती केली जात आहे. रेबीज या रोगाला इतर विषाणूजन्य रोगांमुळे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, या रोगामुळे जीव जाऊ शकतो. यासाठी वेळेत आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.   यासाठी रेबीज प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे.

पशुसंगोपन खात्यामार्फत रेबीजला अटकाव करण्यासाठी 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हय़ातील 193 लहान-मोठय़ा पशुवैद्यकीय दवाखान्यांतून कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या काळात श्वान पालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्मयात 9 हजार 80 इतकी पाळीव कुत्र्यांची संख्या आहे. विशेषतः गाय, म्हैस, बैल, शेळय़ा, मेंढय़ा आणि कुत्र्यांमध्ये पिसाळणे ही विकृती कुत्रा चावल्यामुळे होते. हा प्राणघातक रोग होण्यापूर्वीच कुत्र्यांना प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे. यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत सर्व कुत्र्यांना आणि निरोगी कुत्र्यांनादेखील ही लस दिली जाणार आहे. जिल्हा व तालुक्मयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतून 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान ही मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

Related Stories

मच्छे कुस्ती मैदान मारले गणेश फडकेने

Amit Kulkarni

गोव्याकडे जाण्यासाठी मुभा देण्याची मागणी

Amit Kulkarni

नंदगड येथे समाज विज्ञान विषयाची कार्यशाळा

Omkar B

हलगा-मच्छे बायपासला विरोध कायम

Amit Kulkarni

तरुणाईच्या उत्साहात दुर्गामाता दौड

Amit Kulkarni

सणासुदीतही खानापूर रोडसह विविध रस्त्यांवर अंधार

Patil_p
error: Content is protected !!