Tarun Bharat

रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेडच्या कामगारांचे विविध मागण्यासांठी उपोषण

वार्ताहर / कसबा सांगाव

कागल हातकणंगले पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेनी कामगारांना सेवेत कायम व पगार वाढ करण्याच्या मागणीसाठी रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेडच्या ट्रेनी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यात 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट समोरच आमरण उपोषणास सुरुवात केले आहे.

रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड या कंपनीत 2015 साली कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नियमानुसार कर्मचाऱ्यांना कंपनीने 2017 साली सेवेत कायम करणे गरजेचे होते. त्यानुसार 2017 साली कंपनीने कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत नोटीस सुद्धा जारी केली होती . पण काही कारणास्तव ती नोटीस कंपनीने काही वेळातच रद्द केली. यानंतर आज आखेर यावर काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी मॅनेजमेंट व कर्मचारी युनियन यांच्याकडे वारंवार मागणी करूनही कंपनी मॅनेजमेंट व युनियन यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही .याबाबत वेळोवेळी दिशाभूल करणारी उत्तरे दिली. यासाठी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

कंपनी मॅनेजमेंटने सर्व ट्रेनी कामगारांच्या भविष्याचा विचार करून करून कामगारांना सेवेत कायम करून तसेच कामगारांना योग्य ती पगार वाढ करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन कामगार आयुक्त व कंपनी मॅनेजमेंटला देणेत आले आहे. यावेळी साताप्पा पाटील, सय्याजी पाटील, मारुती फराकटे, अवदूत शैनवे, चेतन मोरे, सचीन खामकर, सतीश पाटील, किरण पोवार, अक्षय पाटील आदींसह कामगार उपोषणास बसले आहेत.

Related Stories

जयसिंगपुरातील माने केअर सेंटरमधील डायलिसिस टेक्निशियनला जीवे मारण्याची धमकी

Archana Banage

कोरोना योध्द्यांना दिवाळी भेट

Archana Banage

हत्तीप्रवण भागातील शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई

Archana Banage

प्रशिक्षित ‘डॉग कॅचर’ची कमतरता

Archana Banage

बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल- शरद पवार

Abhijeet Khandekar

नव्या शेती कायद्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण

Archana Banage