Tarun Bharat

रेमडीसिव्हीयरचा काळाबाजार तात्काळ थांबवावा : समरजितसिंह घाटगे

वार्ताहर / उदगाव

कोरोनाच्या काळात राज्यात रेमडीसिव्हीयर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असून यातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरीकांची उपचार घेताना अर्थिक लुट होत आहे. यासाठी शासनाने औषधाचा हा काळाबाजार तात्काळ थांबवावा, अन्यथा तिव्र आंदोलन करुन शासनास याचा जाब विचारणार असल्याचा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

शिरोळ तालुकयातील उदगांव कुजंवन येथील कोव्हिड सेंटरला समरजितसिंह घाटगे यांनी भेट देवून पाहणी केली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, जिल्हयात सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना रुग्ण संख्येत घट होत असली तरी प्रत्येक नागरीकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन औषध उपचार केले तरच आपण मात करु यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपुस केली. विविध सेवा सुविधांचा आढावा घेत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सवांद साधुन लागेल ती मदत करु असे आश्वासन दिले. याप्रसंगी शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

जाहीर प्रचाराला पूर्णविराम, छुपी रणनिती सुरु

Archana Banage

मुरगूडातील महिला बेपत्ता

Archana Banage

शाहूवाडी तालुक्यात गवतास आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान

Archana Banage

छत्रपती शाहू स्टेडियम फुटबॉल शौकिनांसाठी खुले

Abhijeet Khandekar

Kolhapur : सरकारी जमिनीची पिक पाणी नोंद निरंक

Abhijeet Khandekar

चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक

Archana Banage