Tarun Bharat

केंद्र सरकार रेमडेसिविरचा पुरवठा थांबवणार

नवी दिल्ली /प्रतिनिधी

देशात काही दिवसापूर्वी रेमडेसिविर औषधाच्या तुडवाड्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर मिळत नसल्याने नातेवाईक रेमडेसिविर खरेदीसाठी तासंतास रांगेत उभे राहत होते. आता देशात रेमडेसिविर खरेदीकरण्यासाठी रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या औषधाचे उत्पादन १० पटीने वाढले असून देशाची उत्पादनक्षमता प्रतिदिन ३३ हजार कुप्यांवरून ११ एप्रिल २०२१ रोजी प्रतिदिन २,५० हजार कुप्या झाली, असे त्यांनी सांगितले.

सरकारने केवळ एका महिन्यात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची संख्या२० वरून ६० वर नेली. आता देशात या औषधाचा पुरेसा साठा असून त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात खूपच जास्त आहे, अशी माहितीही मांडविय यांनी दिली. मांडविय यांनी रेमडेसिविरच्या देशातील उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध दरनिश्चिती संस्था आणि सीडीएससीओ ला दिले आहेत. आकस्मिक गरजेसाठी राखीव साठा म्हणून भारत सरकारने रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी रेमडीसीवीरच्या तुटवड्यामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. रूग्णांचे नातेवाईक तासनतास रांगेत उभे होते.महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती होती. नंतर सरकारने रेमडीसीवीरच्या पुरवठयासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे त्याच्या वितरणाचे अधिकार दिले होते. पण आता परिस्थिती सुधारली आहे. काही दिवसांपूर्वीच तिसर्‍या लाटेचा धोका पाहता रेमडीसीवीर सह अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील जिल्हाधिकार्‍यांना केले आहे.

Related Stories

बीएसएफच्या आणखी 21 जवानांना कोरोनाची बाधा

tarunbharat

सोने-चांदी दरात पुन्हा घसरण

Patil_p

काँग्रेसच्या राज्यसभा उपगटनेतेपदी प्रमोद तिवारी तर रजनी पाटील यांची व्हिप म्हणुन निवड

Abhijeet Khandekar

बढतीतील आरक्षण लागू होण्याचे संकेत

Patil_p

असदुद्दीन ओवैसींच्या घराची तोडफोड; हिंदू सेनेचे 5 जण ताब्यात

datta jadhav

चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं

Archana Banage