Tarun Bharat

रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी आतापर्यंत १०४ जणांना केली अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना रुग्णावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती तेव्हा नागरिकांनी रेमडेसिवीर खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर रांगा लावल्या. त्यांनतर राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु झाला.

राज्यात भरमसाठ पैसे घेऊन रेमडेसिवीरची विक्री केली जात होती. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनंतर रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. कोविड -१९ प्रकरणे वाढू लागल्यामुळे एप्रिल महिन्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्या प्रकरणी पोलीस पथकांनी १०४ लोकांना अटक केली आहे.

दरम्यान, अटक केलेल्या संशयितांमध्ये काही डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट आणि खासगी रुग्णालयांचे कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना लढाईत आघाडीवर असलेल्या सरकारी संस्था व्हिक्टोरिया हॉस्पिटल आणि केसी जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी कोणत्याही बोगस कुपी वापरल्या नाहीत. “ज्यावेळेस आपण कुपी ठेवतो त्या क्षणी ते आपल्यास कळेल की ती बनावट आहे की नाही. आम्ही बनावट रेमडेसिवीर बद्दल वाचतो, पण आम्ही त्या सर्वांना दाखवून दिल्या आहेत, ”असे डॉक्टर म्हणाले.

Related Stories

परिवहन कर्मचाऱयांचा 18 पासून संप

Patil_p

मंड्या : बेकायदा उत्खनन थांबविण्यासाठी प्रशासनाची धडक कारवाई

Archana Banage

म्युकरमायकोसिस : डॉक्टरांना इम्युनोमोड्युलेटिंग औषधांचा वापर न करण्याच्या सूचना

Archana Banage

कर्नाटक : खाजगी रुग्णालयात ५० टक्के बेड आरक्षित ठेवा

Archana Banage

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याबाबत टास्क फोर्सचा अहवाल सादर

Archana Banage

मुलांसाठी बेड्स राखीव ठेवावेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!