Tarun Bharat

‘रेमडेसिवीर’चे वितरण अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच

सातारा / प्रतिनिधी :   

सातारा : जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येचा विचार करता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई भासत असून, रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सीसीसी व सीडीएचसी खाजगी हॉस्पिटल्स आणि होलसेल व रिटेल मेडिकल वितरक-डिस्ट्रीब्युटर्स यांनी त्यांना प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठय़ाची अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्या वितरण आदेशानुसारच विक्री व वितरण करावे. परवानगीखेरीज कोणतेही परस्पर विक्री व वितरण करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी कळविले आहे. 

अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द, साथरोथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा दुरुस्ती कायदा 2005 चे कलम 2(a)(ग्ग्ग्) नुसार  सेवा बजावण्याच्या  अनुषंगाने केलेल्या निष्काळजीपणाबद्दल हॉस्पिटल व मेडिकल लायसेन्स – परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही कळविले आहे.

Related Stories

कठपुतली प्रशासनाच्या निषेधार्थ लाठी मोर्चा

Patil_p

तहसिल कार्यालयातील संगणक चालक जाळ्यात

Amit Kulkarni

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मटका जोमात

Patil_p

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सहकारमंत्र्यांचाच यंत्रणेवर दबाव : दरेकर

datta jadhav

सातारा : वडूज परिसातील १७ गावात एक गणपती

Archana Banage

समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ साताऱयाचे तरुण रस्त्यावर

Patil_p