Tarun Bharat

‘रेमडेसिवीर’च्या वापरावर निर्बंध

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 

कोरोना उपचारांवर प्रभावी ठरलेल्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या वापरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने निर्बंध आणले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे हे इंजेक्शन केवळ ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांनाच देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनलाही याबाबत कळविण्यात आले आहे. 

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना उपचारांवर प्रभावी ठरलेल्या ‘रेमडेसिवीर’ औषधाचे उत्पादन फारच कमी औषध कंपन्यांकडून घेतले जाते. त्यामुळे या औषधाचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक गरज असलेल्या रुग्णांनाच हे औषध मिळावे, यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे आदेश देण्यात आल्याचे  अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी सांगितले. 

कोविड -19 वर उपचार करणाऱ्या प्रत्येक रुग्णालयाने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराबाबत नोंदवही ठेवावी. त्यामध्ये रुग्णांचे नाव, पत्ता आणि इंजेक्शनसाठी आकारलेले मूल्य याचा उल्लेख असावा. त्यामुळे इंजेक्शनचा बाजारातील काळाबाजार रोखता येईल, अशा सूचनाही एफडीएने दिल्या आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात ४,६६६ नवे कोरोनाबाधित, १३१ मृत्यू

Rohan_P

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल

Rohan_P

ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांना ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’

Rohan_P

नुपूर शर्मा, जिंदालांवर केंद्राने कारवाई करावी; गृहमंत्री वळसे पाटलांची मागणी

Abhijeet Shinde

शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!