Tarun Bharat

रेमडेसिवीर इंजेक्शन गैरव्यवहारप्रकरणी विजापुरात 9 जणांना अटक : दोघी फरारी

वार्ताहर / विजापूर

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे चतुर्थश्रेणी डी ग्रुप कर्मचारी राजेसाब बाबू हत्तरकीहाळ, इम्तीयाज हुसेनसाब मट्टी, शिवराजकुमार सिद्धनगौडा मदरी, मौलाली रजाकसाब हत्तरकीहाळ,
स्टाफ नर्स जकप्पा तडलगी, डॉ. बांगी हॉस्पिटलचे फार्मासिस्ट संजीव जोशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्स यल्लम्मा कन्नाळ, सुरेखा गायकवाड या दोघी फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी संशयितांकडून तीन रेमडेसिवीर बॉटल, वापरलेल्या 24 बॉटल व रोख रक्कम 64 हजार व सात मोबाईल जप्त केले आहेत. संशयित संगनमताने गरजूकडून जास्त पैसे घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करत होते, असे पोलीस तपासात आढळून आले. संशयितांवर ड्रग कंट्रोल ऍक्ट 1940 अंतर्गत प्रकरण दाखल केले आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

सराफींना फसविणारी जोडगोळी गजाआड

Amit Kulkarni

युवा समितीच्या नूतन कार्यकारिणीची निवड

Amit Kulkarni

कोगनोळीत बिरदेव यात्रेनिमित्त पालखी सबिना उत्साहात

Omkar B

बेळगावमधील फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी डिसेंबरपर्यंत कार्यान्वित

Amit Kulkarni

महामार्गावरील दुभाजकाला कारची धडक

Amit Kulkarni

राज्य स्क्वॅश स्पर्धेत दीप्शिका थोरात अजिंक्य

Amit Kulkarni