Tarun Bharat

रेमडेसिवीर चोरी केल्याप्रकरणी नर्सला अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर शोधताना दिसत आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार होताना दिसत आहे. याआधी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जयनगर जनरल हॉस्पिटलमधील एका२५ वर्षीय नर्सला अटक केली आणि त्याच्याकडील ६ रेमडेसिवीर औषधाच्या कुपी जप्त केल्या. एच. मारुतीने पोलिसांनी सांगितले की यापूर्वी ज्या रुग्णांना रेमडेसिवीर देण्यात आले होते त्यांच्याकडून ते चोरले होते. दरम्यान प्रत्येकी एक रेमडेसिवीर २०,००० रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. “रेमडेसिवीरच्या कुपी वेगवेगळ्या रुग्णांच्या नावे विकत घेण्यात आल्या आहेत. आम्ही रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णांची वैद्यकीय नोंदी सामायिक करण्यास सांगितले, असे सीसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. गहाळ झालेल्या कुपी त्यांच्या लक्षात कशा आल्या नाहीत याबद्दल स्पष्टीकरण मागविले जाईल, असे सीसीबीने म्हंटले आहे.

Related Stories

रमेश जारकीहोळींचा राजीनामा

Patil_p

सौंदत्ती यल्लाम्मा मंदिराचे दर्शन खुले नाही..!

Rohit Salunke

बहिण-भावासह तीन वर्षाचे बालक अपघातात ठार

Amit Kulkarni

२९ मार्चपासून म्हैसूर-चेन्नई मार्गावर नवीन उड्डाण

Archana Banage

राज्य विधिमंडळ अधिवेशन 28 जानेवारीपासून

Patil_p

कर्नाटकात वैद्यकीय, पॅरामेडिकल महाविद्यालये पुन्हा उघडली

Archana Banage