Tarun Bharat

रेल्वे,एस.टी बसस्थानकाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय करा

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

 रेल्वेस्टेशन, एस.टी. बसस्थानक या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी तत्काळ स्वच्छतागृह व शौचालयाची व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन वंचित बहुतन आघाडीच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त व रेल्वे आणि एस.टी विभागाच्या संबंधित अधिकाऱयांना दिले.

 निवेदनात म्हटले आहे, रेल्वेस्टेशन व एस टी बसस्थानकाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील महिला व कॉलेजला जाणाऱया मुली तसेच पुरुषांची नेहमी वर्दळ असते. त्या ठिकाणी स्वच्छतागृह व शौचालयाची सोय उपलब्ध नसल्यामुळे महिलांसह पुरुषांचीही कुचंबना होत आहे. याबाबत संबंधित विभागांकडे वारंवार मागणी केली असतानाही त्याची आजतागायत दखल घेतलेली नाही.

त्यामुळे मागणीचा गांभिर्याने विचार करून रेल्वेस्थानक व एस.टी बसस्थानकाच्या ठिकाणी स्वच्छतागृह व शौचालयाची  सोय करावी. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मच्छिद्र कांबळे, डॉ. आनंद गुरव, विमल पोखरनीकर, संभाजी कागलकर, शिवाजी परळीकर, विक्रम कांबळे, ऋषीकेश पाटील, विशाल कांबळे, दशरथ कांबळे आदी उपस्थित होते.

Related Stories

नानारुपी, शब्दरुपी ‘शाहू महाराज’ आता एकाच ग्रंथरूपात!

Abhijeet Shinde

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठात परीक्षेसंदर्भात अडचणींचा पाढा

Abhijeet Shinde

पन्हाळा तालुक्यात कोरोनाचे 48 तासात 94 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महाराष्ट्र हॉलीबॉल असोसिएशनची अधिकृत वेबसाईट सुरू करणार : विजय डांगरे

Abhijeet Shinde

आता मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच : शाहू छत्रपती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!