Tarun Bharat

रेल्वेची कमाई नीचांकी स्तरावर

कोच अपग्रेडेशन रोखले

नवी दिल्ली : कोरोनाकाळात भारतीय रेल्वेची कमाई कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत केवळ 10 टक्क्यांइतकी राहिली आहे. रेल्वेचे उत्पन्न नीचांकी स्तरावर पोहोचल्याचे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. एकीकडे रेल्वेच्या मालवाहतुकीवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे, तर अनेक प्रवासी रेल्वे अद्याप उभ्या असल्याने उत्पन्नाला फटका बसला आहे.  उत्पन्नात प्रचंड घट झाल्याने रेल्वेने सुमारे 2,700 कोटी रुपयांच्या कोच अपग्रेड (डब्यांचा विकास) करण्याचे कामही रोखले आहे. रेल्वेने सध्या स्मार्ट कोच, बायो वॅक्यूम टॉयलेट, अँटी ग्राफिटी कोटिंग आणि कोचच्या रीफर्बिशमेंटला टाळले आहे. तर प्रवाशांच्या सुविधांशी निगडित प्रकल्प सद्यस्थितीत रोखण्यात आला आहे किंवा रद्द करण्यात आला आहे.

Related Stories

इटालिया, गढवी, अल्पेश होणार विजयी

Patil_p

‘आप’ला भरावे लागणार 164 कोटी

Amit Kulkarni

छत्तीसगड : रायपूरमध्ये 22 ते 28 जुलै पुन्हा लॉक डाऊन

Tousif Mujawar

मराठा आरक्षण : ”आता लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी स्पष्ट करावी”

Archana Banage

शहरांमुळेच विकासाला मिळणार वेग

Patil_p

‘धनुष्यबाणा’वर आज आयोगासमोर सुनावणी

Amit Kulkarni