सध्या बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. रोहतास येथील एका प्रखंडामध्ये एक अभिनव मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. हा मॉडेल बुथ मतदारांचे आकर्षण बनला आहे. हे मतदान केंद्र म्हणजे शाळेची एक वर्गखोली आहे. तथापि त्या वर्गखोलीला रेल्वेच्या डब्याचे रुप देण्यात आले आहे. जेव्हा मतदार या मतदान केंद्रासमोर मतदानासाठी रांग लाऊन उभे राहतात. तेव्हा ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उभे असून रेल्वेच्या डब्यात चढत आहे असे दिसते.


या मतदान केंद्रात नुकतेच मतदान पार पडले. बऱयाच मतदारांनी मतदान करण्याबरोबरच या डबासदृश्य मतदान पेंद्राची सेल्फीही काढणे पसंत केले. हा प्रखंड केवळ या मतदान केंद्रासाठी नव्हे तर अभिनव रचनेच्या आणि स्वच्छतेच्या इतर कामांसाठीही प्रसिद्ध आहे. येथील विद्यालये जणु काही वनात वसविल्यासारखे वाटते. संपूर्ण प्रखंडात स्वच्छतेची चोख व्यवस्था येथील प्रशासनाने केली आहे. येथील शाळेतील वर्गाची रचनाही ट्रेनच्या डिझाईनसारखी आहे. या विद्यालयाचे नावही राजकीय मध्य विद्यालय पतलुका स्टेशन असे आहे. त्यामुळे हा प्रखंड पंचक्रोशीत कौतुकभऱया चर्चेचा विषय बनला आहे.