नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया रेल्वेच्या ऍथलीट्सनी पदक मिळविल्यास रोख रकमेची बक्षिसे रेल्वे खात्यातर्फे जाहीर करण्यात आली आहेत. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला 3 कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रेल्वे क्रीडा मंडळाचे 25 ऍथलीट्स तसेच पाच प्रशिक्षक आणि एक फिजोओ सहभागी झाला आहे. भारतीय पथकामध्ये सुमारे 20 टक्के रेल्वेच्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी रेल्वे क्रीडामंडळातर्फे पदक विजेत्याकरिता रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सुवर्णपदक विजेत्याला 3 कोटी, रौप्यपदक विजेत्याला 2 कोटी आणि कास्यपदक विजेत्याला एक कोटी रूपये दिले जातील. त्याचप्रमाणे या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविणाऱया स्पर्धकाला 35 लाख रूपये तसेच प्रत्येक सहभागी खेळाडूला 7.5 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
previous post
next post