Tarun Bharat

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Advertisements

प्रतिनिधी / आटपाडी

रेल्वे बोर्डात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आटपाडी व वाक्षेवाडी येथील दोघा युवकांकडून पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नांदेड येथील चंद्रशेखर अच्युत जोगळेकर याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आटपाडी-विठ्ठलनगर येथील विनायक मारूती जानकर आणि वाक्षेवाडी येथील प्रविण नागू मोटे या युवकांच्या राहते घरी येऊन विश्वास संपादन करून चंद्रशेखर जोगळेकर याने माझ्या मावशीचा नवरा रेल्वे बोर्डात नोकरीस असल्याचे सांगत त्याच्यामार्फत दोघांना रेल्वेत नोकरीस लावतो असे सांगून प्रत्येकी अडीच लाख रूपये घेतले. तेव्हापासून म्हणजे 17 मे 2019 पासून आजतागायत नांदेडच्या या बहाद्दराने या दोन्ही तरूणांना नोकरीही लावली नाही. आणि त्यांचे पैसेही परत दिले नाहीत.

त्यामुळे हैराण झालेल्या प्रविण मोटे याने आटपाडी पोलिसात फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने चंद्रशेखर जोगळेकर(रा. रामराव पवार मार्ग श्रीनगर नांदेड जि.नांदेड) याच्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगळेकर याने फिर्यादी व यातील साक्षीदार, सांगली एसटी स्टॅण्ड समोरील लक्ष्मी लॉज आणि मुंबई येथे वेळोवेळी ही फसवणूक करून नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

Related Stories

कुपवाडमध्ये घरफोडी; २४ हजारांचे दागिने लंपास

Sumit Tambekar

शिक्षण क्षेत्रात ठाकुर यांचे भरीव कार्य : गजानन धामणेकर; लोकमान्य तर्फे गुणवंतांचा सत्कार

Abhijeet Shinde

सांगली : यार्डात दररोज ३० हजार पोती हळदीची विक्री!

Abhijeet Shinde

सांगली : हरिपूर ग्रामपंचायत सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित

Abhijeet Shinde

नाठवडेत जनावरांच्या शेडला आग, सुमारे 2 लाखाचे नुकसान

Sumit Tambekar

सांगली : सीमाप्रश्नी अमित शहांची भेट घेणार : खासदार संजयकाका पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!