Tarun Bharat

रेल्वेने दोन कोटी रुपये प्रवाशांचे केले परत

Advertisements

सोलापूर विभागातून आरक्षित तिकिटांचा परतावा

तरुण भारत सवांद प्रतिनिधी / सोलापूर

कोरोना व्हायरसमुळे पूर्ण देशभरात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे यात्री मेल एक्सप्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आरक्षण केंद्र सुद्धा बंद केले होते. ज्या प्रवाशांनी आरक्षित तिकीट खरेदी केले होते, त्यांच्या तिकिटाचा परतावा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून करण्यात येत आहे. २६ मेपासून सुरू करण्यात आलेल्या आरक्षण तिकिटांच्या परतावा सोलापूर विभागातून आरक्षित केलेल्या रेल्वे प्रवाशांचे आतापर्यंत दोन कोटी रुपये रेल्वेने परत करण्यात आल्याची माहिती वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

आरक्षित तिकिटांचा परतावा देण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर फिजिकल डिस्टन्स याची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक बनविले आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. आरक्षण तिकीटवर परतावा देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात आरक्षित केलेल्या रेल्वे गाडय़ांचे तिकिटांचे पैसे सर्व प्रवाशांना परत मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांनी नियोजित तारखेप्रमाणे स्थानकावरून आपली आरक्षित तिकिटांचा परतावा घेऊन जावा, असे सांगण्यात आले आहे.

सर्व प्रवाशांना आरक्षित तिकिटांचा परतावा
कोरोनामुळे लॉकडाऊन काळात आरक्षित केलेल्या तिकिटांचा परतावा पूर्णपणे प्रवाशांना मिळणार आहे. आतापर्यंत सोलापूर विभागातून दोन कोटी आरक्षित तिकिटांचा परतावा प्रवाशांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर यापुढेही राहिलेल्या सर्व प्रवाशांना आरक्षित तिकिटांचा परतावा देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार प्रवाशांनी आरक्षण खिडकी येथे तिकीटांचा परतावा दिला जाणार आहे.
-प्रदीप हिरडे, वरि÷ वाणिज्य व्यवस्थापक

Related Stories

सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करा, अभविपची निदर्शने

Abhijeet Shinde

शिंदे-फडणवीसांचे सरकार मोदी-शाहांचे गुलाम

datta jadhav

”लातूर पालकमंत्री व आयुक्त यांच्या संगनमताने वसुली मोहीम सुरू”

Abhijeet Shinde

‘कोरोनाचं संकट दूर होऊ दे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विघ्नहर्त्याला साकडे

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात आज 37 कोरोना पॉझिटिव्ह तर एक मृत्यू

Abhijeet Shinde

शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले, तिघांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!