Tarun Bharat

रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी हवा पाकिस्तानी व्हिसा

Advertisements

भारतातील अनोखे रेल्वेस्थानक

भारतातून अन्य देशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते. पण देशातच रेल्वेप्रवास करण्यासाठी अन्य देशाच्या पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासत असल्याचे कधी वाचले आहे का? भारतातील एका स्थानकावर जाण्यासाठी शेजारी देश पाकिस्तानचा व्हिसा आणि पासपोर्टची गरज भासते. त्यांच्याशिवाय प्रवास करता येत नाही. येथे पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय पकडले गेल्यास थेट तुरुंगात रवानगी होते.

भारतीय नागरिकांना पाकिस्तानी व्हिसा बाळगणे अनिवार्य असलेले हे देशातील एकमात्र रेल्वेस्थानक आहे. पाकिस्तानी सीमेनजकी अटारी रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसाची गरज भासते. या रेल्वेस्थानकाचे पूर्ण नाव अटारी श्याम सिंह आहे.

अन्यथा गुन्हा नोंद

हे रेल्वेस्थानक पंजाबच्या अमृतसर जिल्हय़ात आहे. या स्थानकावर व्हिसाशिवाय पकडले गेल्यास गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. या गुन्हय़ाप्रकरणी जामीन मिळणे अत्यंत अवघड आहे. या स्थानकातून समझौता एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला जातो. हे स्थानक भारताच्या पंजाबमध्ये असले तरीही पाकिस्तानी व्हिसाशिवाय तेथे कुठलाच भारतीय जाऊ शकत नाही.

अत्यंत अधिक सुरक्षा

पाकिस्तान सीमेवर असलेल्या अटारी रेल्वेस्थानक नेहमीच सुरक्षा दलांच्या देखरेखीत असते. गुप्तचर यंत्रणांची या स्थानकावरील हालचालींवर विशेष नजर असते. या रेल्वेस्थानकावरून रेल्वेतिकीट खरेदी करणाऱया सर्व प्रवाशांच्या पासपोर्टचा क्रमांक लिहिला जातो आणि त्यानंतरच त्यांना प्रवासासाठी कन्फर्म तिकीट मिळते.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या स्थानकावर कुलींना मज्जाव आहे. येथे स्वतःचे सामान स्वतःलाच उचलावे लागते. स्थानकावर बसविण्यात एलईडी स्क्रीनवर देशभक्तीपर गाणी आणि चित्रपट ऐकायला आणि पहायला मिळतील.

Related Stories

सिसोदियांचा आरोप, भाजपचे प्रत्युत्तर

Patil_p

देशात कोरोनाबाधितांमध्ये घट

Patil_p

‘धनुष्यबाणा’सह शिवसेना नावही गोठविले

Patil_p

मोफत योजनांवर बंदी घालण्याचा मार्ग शोधा

Patil_p

अशोक लवासांनी सोडले निवडणूक आयुक्तपद

Patil_p

काश्मिरी पत्रकाराला विमानतळावर रोखले

Amit Kulkarni
error: Content is protected !!