Tarun Bharat

रेल्वे अधिकाऱयाने मागितली एलिनाची माफी

प्रतिनिधी / पणजी :

आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांना वाईट वागणूक देत पोर्तुगीज शब्द वापरून अपमान केलेल्या रेल्वे अधिकारी अजयकुमारसिंग यांनी काल एलिना साल्ढाणा यांची माफी मागितली. मुख्यमंत्र्यांनी काल आल्तिनो येथील निवासस्थानी अजयकुमारसिंग यांना बोलावून घेतले होते. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा अधिकारी विनोदकुमार यांचीही उपस्थिती होती.

रेल्वे अधिकारी अजयकुमारसिंग यांनी आमदार एलिना साल्ढाणा यांना वाईट वागणूक दिल्यानंतर हा विषय बराच गाजला होता. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांपाशी तक्रार केली नव्हती. त्यामुळे कारवाईला थोडा उशीर झाला, असे एलिना साल्ढाणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, असे अधिकारी गोव्यात असू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकाऱयाने माफी मागितली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागावी, असेही सूचित करण्यात आले. ज्याला भावना नियोजित करता येत नाही, अशा अधिकाऱयाने गोव्यात राहू नये, असे मुख्यमंत्र्यांचेही म्हणणे असल्याचे एलिना साल्ढाणा यांनी सांगितले.

 

Related Stories

आयआयटी रद्द केल्याचे लेखी आश्वासन मिळे पर्यंत आंदोलन चालूच

Patil_p

युवा काँग्रेसने रस्त्यांवरील खड्डय़ांत पेटविल्या मेणबत्त्या

Amit Kulkarni

मनपा – मोन्सेरात पॅनलची उद्या घोषणा

Patil_p

सतावणूक प्रकरणी मंत्री, अधिकाऱयांविरोधात न्यायालयात

Amit Kulkarni

काही नेते स्वताच्या स्वार्थासाठी सरकारवर दबाव आणण्याचे काम करतात

Patil_p

राज्यात 62 नवे मोबाईल टॉवर उभारणार

Patil_p