Tarun Bharat

रेल्वे इंजिनच्या धडकेत चिंचवाड येथील महिलेचा मृत्यू

Advertisements

उचगाव / वार्ताहर

रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनची धडक बसून अश्विनी अमोल धुमाळे (वय 35) रा.चिंचवाड ता.करवीर या मुकबधीर महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दूर्दैवी घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिंचवाड स्मशानभूमी जवळ घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,अश्विनी धुमाळे नेहमीप्रमाणे चिंचवाड येथील इलेक्ट्रिकल दुकानात कामास गेली होती. तिच्या अचानक पोटात दुखू लागल्याने ती चिंचवाड येथील घरी येण्यास निघाली होती.

ती मूकबधिर असल्याने तिला बोलता व ऐकण्यास येत नव्हते. चिंचवाड येथील स्मशानभूमी लगत असणारे रेल्वेरूळ ओलांडून घरी जात होती. त्याच दरम्यान रेल्वे इंजिन कोल्हापूरहुन मिरजकडे जात होते. रेल्वे ड्रायव्हरने हॉर्न केला पण तिला ऐकु न आलेने तिला रेल्वे इंजिनची जोराची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या घरामध्ये एक भाऊ व बहीण ही मुकबधीर आहेत.

तिचा विवाह ही एका मुकबधीर इसमाशी झाला आहे. या घटनेने चिंचवाडसह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची फिर्याद चुलते विजय भाऊ कांबळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपघाताचा तपास पोलीस हवालदार विराज डांगे करत आहेत.

Related Stories

राज्यपालांच्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? संभाजीराजे

Archana Banage

संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये सर्वांनी खबरदारी घेण्याचे आ.मुश्रीफ यांचे आवाहन

Abhijeet Khandekar

Kolhapur : अधिकाऱ्यांना अरेरावी करत असाल तर ते बांधकाम पाडणारच!

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कतृत्ववान महिलांचे संघटन करणार

Archana Banage

कोल्हापूर : बेकायदेशीर पानमसाला विक्री करणाऱ्या एकास अटक

Archana Banage

सांगली : मिरजेच्या तरुणाचा निर्घृण खून

Archana Banage
error: Content is protected !!