Tarun Bharat

रेल्वे गाडय़ा बंदची मालिका सुरूच

लॉकडाऊनमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अजून चार गाडय़ा बंद

कणकवली:

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊन यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाडय़ा तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्या आहेत. शुक्रवारीही चार गाडय़ा रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कोकण रेलवेमार्गावरील प्रवासी गाडय़ा थांबविण्यात आल्या. पुढे लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊ लागल्यानंतर कोकण रेल्वेच्या ट्रकवर गाडय़ाही धावू लागल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाल्याने शासनातर्फे कडक निर्बंध, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परिणामी, रेल्वेच्या प्रवाशांची संख्याही घटल्याने प्रवासीगाडय़ा रद्द कराव्या लागत आहेत.

गांधीधाम – तिरुनवेली विकली फेस्टिव्हल स्पेशल (09424) 10 मेपासून व तिरुनवेली – गांधीधाम (09423) 13 मेपासून, इंदोर – कोचुवेली सुपरफास्ट विकली स्पेशल (09332) 11 मेपासून व कोचुवेली – इंदोर (09331) 14 मेपासून, हापा – मडगाव सुपरफास्ट विकली स्पेशल (02908) 12 मेपासून व मडगाव – हापा (02907) 14 मेपासून, पोरबंदर – कोचुवेली सुपरफास्ट विकली स्पेशल (09262) 13 मेपासून व कोचुवेली – पोरबंदर (09261) 16 मेपासून रद्द करण्यात आल्याची माहिती को. रे. प्रशासनाने दिली आहे.

Related Stories

देशव्यापी संपात रत्नागिरीत बँक, महावितरण कर्मचाऱयांचा सहभाग

Patil_p

अग्निशमन केंद्रासाठी निधी द्या

NIKHIL_N

Ratnagiri : आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; CEO इंदुराणी जाखड यांची घोषणा

Archana Banage

जिल्हय़ातील 34 धरणे तुडुंब भरली

Patil_p

मासेमारी बंद, आंदोलन सुरू

NIKHIL_N

372 अंगणवाडय़ा, 185 शाळांना मिळणार नळ कनेक्शन

NIKHIL_N