Tarun Bharat

रेल्वे बसस्थानकातील गाळय़ांसाठी तिसऱयांदा लिलाव प्रक्रिया

निविदा सादर करण्यासाठी 5 पासून 22 डिसेंबरपर्यंत मुदत

प्रतिनिधी /बेळगाव

रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकातील सहा गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित सहा गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी यापूर्वी दोनवेळा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद लाभला नसल्याने आता तिसऱयांदा लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली असून दि. 5 ते 22 पर्यंत निविदा भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. याठिकाणी बारा व्यापारी गाळय़ांची उभारणी करण्यात आली असून स्मार्ट बसथांबा आणि आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, या बसस्थानकावर परिवहन मंडळाकडून अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच काही लांबपल्ल्याचा बसेस बसथांब्यावर न येताच परस्पर जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील गाळय़ांना प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

येथील बारापैकी सहा गाळे जुन्या गाळेधारकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित सहा गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी कॅन्टोन्मेंटने यापूर्वी दोनवेळा लिलाव प्रक्रिया राबविली होती. पण बसफेऱया होत नसल्याने प्रवाशांची वर्दळ कमी असल्याची तक्रार करून लिलाव प्रक्रियेकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे दोन्हीवेळा लिलाव प्रक्रियेला थंडा प्रतिसाद लाभला. आता कॅन्टोन्मेंट बोर्डने तिसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित केली असून ऑनलाईनद्वारे लिलाव प्रक्रिया चालणार आहे. दि. 5 पासून लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होणार असून 22 डिसेंबर रोजी बोली लागणार आहे. यावेळी तरी गाळय़ांना भाडेकरू मिळणार का? याकडे कॅन्टोन्मेंटचे लक्ष लागले आहे.

Related Stories

रेल्वे स्थानकात ‘पे ऍण्ड पार्किंग’ची व्यवस्था

Omkar B

मनपा निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Amit Kulkarni

यंग बेळगाव फाउंडेशनने राबविला ‘हा’ स्तुत्य उपक्रम

Rohit Salunke

घरांसाठी मनपा कार्यालयासमोर ठिय्या

Patil_p

तानाजी गल्ली-धारवाड रोड समस्यांच्या गर्तेत

Amit Kulkarni

अर्धवट सीडीवर्कमुळे अडकतात वाहने

Amit Kulkarni