नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाटत आहे. काही ठिकाणी लसींचा तुटवडा तर काही ठिकाणी रूग्णांना बेड मिळत नाहीत, अशा अनेक समस्यांचा सामना रूग्णांना करावा लागत आहे. परिणामी आरोग्यंत्रणा कोलमडत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून भारत सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालयाने 64 हजार बेडसह जवळपास 4 हजार कोविड केअर कोच राज्यांना वापरासाठी तयार केले आहेत. सध्या 169 कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले आहेत. अशा माहिती देण्यात आली आहे. राज्यांच्या मागणीनुसार रेल्वेने नागपूर, भोपाळ, इंदौर जवळील तिहीसाठी कोविड केअर कोच तयार केले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि नागपूर महापालिका आयुक्त यांच्यात 11कोविड केअर कोचसाठी सामंजस्य करार झाला आहे. अशी देखील माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.


previous post