Tarun Bharat

रेल्वे सेवाही 3 मे पर्यंत बंद राहणार

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात चालू असलेला लॉक डाऊन 3 मे पर्यंत कायम राहणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या घोषणे नंतर आता रेल्वे प्रशासनाकडून ही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयानुसार, आता तीन मे पर्यंत देशातील रेल्वे सेवा देखील बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या काळात ज्या ट्रेन रद्द झाल्या आहेत, त्या तिकिटांचा पूर्ण रिफंड प्रवाशांना दिला जाणार आहे तसेच पुढील काळात रेल्वे सेवा कधी सुरू केली जाईल याबाबत आत्ताच सांगणे शक्य नाही आहे असे ही रेल्वे प्रशासन विभागाने सांगितले आहे.


मात्र आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एखदी ट्रेन सुरु करण्यात येईल, याबाबत आगाऊ घोषणा केली जाईल. तसेच तीन मे पर्यंत आगाऊ बुकिंग बंद करण्यात आले आहे.


या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मात्र मालवाहतूक सुरू राहील असे रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Related Stories

मराठा समाजाला दिलासा; EWS नुसार १० टक्के आरक्षण मिळणार, शासन निर्णय जारी

Archana Banage

आर्थिक आरक्षणाचा निर्णय संविधानाला धक्का पोहोचवणारा

datta jadhav

भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी

datta jadhav

‘करुणा आणि धनंजय मुंडे यांची प्रेम कहानी मराठीत येणार’

Archana Banage

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 27 डिसेंबरला

Tousif Mujawar

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav