Tarun Bharat

रेवति हरिखेली येणें बोलें

Advertisements

बलरामाची पत्नी रेवती ही थोरली जावू या नात्याने रुक्मिणीला उपदेश करताना पुढे म्हणाली –

जेंकां उठंडळ डळमळी । अत्यंत झणत्कारें गडबडीं।

आश्रमआळां ठेविं रोकडी । वेळणी तोंडीं विधीची ।

जें कां कांठफरा उललें । देखसी ज्याचें बुड भंगलें ।

ते न पाहिजे हालविलें । असो संचरले निजआळां ।

तपें तापली तुपाची । स्वर्गसिंका बैसका त्याची ।

सामुग्री वेंचिल्या तेथींची । मग उलंडूनि सांडिती ।

कामक्रोधाचे उंदीर । कोरूनि टोलर करिती अपार।

त्यांच्या मुखीं घालूनि पाथर । येतें द्वार बुजवावें ।

लाविल्या लोण नलगे ज्यासी । लोणलक्षण त्या काय पहासी ।

ते तंव नाणावे पंक्तीसी । चवी त्यांसी पैं नाहीं ।

सगळे शिजविता अवघड । काकड करिती कडकड।

समजावें भरडीं दृढ । होतील गोड परिपाकें ।

कणिक चाळावी असकट । पाखडूनि सांडावें कसपट । होईल परिपाक चोखट । पूर्णपुरिया सिद्धलाडू । कृष्णभाणवसा त्रिशुद्धी। अष्टमहासिद्धी नवनिधी।

तेथें तुवां वागावें सोहंबुद्धी । जीवउपाधी सांडूनी ।

सासु सासरे भावे दीर । आदिकरून लहान थोर ।

होऊनि अवघ्यासी सादर । अति तत्पर सेवेसी ।

वडील जाऊ आपण । भीमकीकरिं निजकांकण ।

घालूनि करी निरवण । पाणिग्रहण भाणवसा ।

धाकटे जावेसी प्रीतिकर । नवविध नवरत्नांचा हार ।

कंठीं घातला मनोहर । येरिं नमस्कार तिसी केला ।

रुक्मिणीला उपदेश करताना रेवती म्हणाली-रुक्मिणी! कृष्णाला वरलेस ना? आता सगळे तुलाच करावे लागेल. येथील रीत अशी आहे की सदैव समाधानी व प्रसन्नचित्त असावे. कृष्ण हा परमात्मा आहे. त्याच्याजवळ अष्टमहासिद्धींचा खजिना आहे. म्हणून तू सो।़हं या बुद्धीने वागावे. सासुसासरे, दीर यांच्याशी आदराने वागावे. रेवतीने रुक्मिणीला इतरही संसारातील काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर वडील जावू या नात्याने रेवतीने स्वतःच्या हातातील रत्नकंकण तिची धाकटी जावू रुक्मिणीच्या हातात घातले. तसेच तिच्या कंठात नवरत्नांचा हार घातला.

बाई जें जें तुम्ही शिकविलें । तें तें मज हितासी आलें । रेवति हरिखेली येणें बोलें । आलिंगिलें भीमकीसी। एवं द्वारकेमाझारिं । परमानंद घरोघरिं ।

देव वर्षती कुसुमें अंबरिं । जयजयकार प्रवर्तला ।

मग रुक्मिणी म्हणाली- जावूबाई! तुम्ही मला जे जे शिकवले ते मला समजले. ते माझ्या हिताचेच आहे. त्याप्रमाणे मी वागेन. या बोलण्याने रेवतीला हर्ष झाला. तिने रुक्मिणीला आलिंगन दिले. अशा प्रकारे द्वारकेत घरोघर परम आनंद झाला. देव आकाशातून पुष्पवर्षाव करू लागले. सर्वांनी कृष्ण व रुक्मिणीचा जयजयकार केला.

यापरी गृहप्रवेश । करूनियां हृषीकेश ।

रमायुक्त जगन्निवास । द्वारकावास करीतसे ।

शुक म्हणे परीक्षिती । गृहस्थ जाला श्रीपती ।

भीमकीहरणाची ख्याती । तुजप्रती सांगितली ।

Ad.  देवदत्त परुळेकर

Related Stories

हरिदासचे नऊ रंग

Patil_p

टोळधाड

Patil_p

अपघात की हल्ला ?

Amit Kulkarni

अलीकडील हवामान अंदाजात अचूकता

Patil_p

यूपीएससी, एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षा – स्वप्न आणि सत्य

Patil_p

ब्रह्मरसाचे सेवन करणाऱयाला गुळवण्याचं काय कौतुक वाटणार !

Patil_p
error: Content is protected !!