Tarun Bharat

रेव्हेन्यू कॉलनीत 30 फूट रस्त्यावर अतिक्रमण

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी नेहमी होत असतात. पण  कणबर्गी रोडवरील रेव्हेन्यू कॉलनी येथील 30 फूट रस्त्यासह खुली जागा हडप करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत कारवाई करण्याऐवजी कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याची नोटीस बजावून महापालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे अतिक्रमण करण्यास महापालिकेच्या अधिकाऱयांचा आशीर्वाद आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

रेव्हेन्यू कॉलनी येथे प्लॉट नं. 55 सीटीएस क्र. 4500 च्या भूखंडाची जागा 920 चौ. फूट आहे. मात्र सदर मालकाने प्लॉट नं. 56 सीटीएस क्र. 4501 च्या भूखंडातील जागेवर अतिक्रमण करून सेफ्टिकटँक बांधली आहे. तसेच भूखंडाच्या बाजूस असलेल्या 30 फूट रस्त्यासह 760 चौरसफूट जागा अतिक्रमण करून हडपण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार येथील रहिवासी मन्सूर मुल्ला यांनी महानगरपालिकेकडे केली होती. याबाबत साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे दि. 12 एप्रिल 2019 पासून दि. 2 डिसेंबर 2019 या कालावधील तक्रारीची दहा निवेदने लेखी स्वरुपात दिली होती. तसेच महापालिका आयुक्त आणि नगर योजना अधिकाऱयांकडे चारवेळा तक्रार केली होती. याबाबत महापालिकेने नोटीस पाठविण्याखेरीज आतापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका, महसूल उपायुक्त यांच्याकडे देखील तक्रारी केल्या होत्या. सदर मालकाने 920 चौरसफूट जागेमध्ये घर बांधण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली होती. पण शेजारी असलेल्या भूखंडापैकी आणि रस्ता व खुल्या जागेतही अतिक्रमण केले आहे. सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे याकरिता तक्रारी करूनही दखल घेण्यात आली नसल्याने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच जागेचे भूमापन खात्याकडून मोजमाप देखील करण्यात आले असून, सर्वेक्षण अहवालात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. पण महापालिकेच्या अधिकाऱयांनी भूखंडधारकास आतापर्यंत सहा वेळा नोटीस बजावून कागदपत्रे हजर करावीत आणि अतिक्रमण स्वत:हून हटवून घ्यावे, अशी सूचना केली होती. पण सदर मालकाने आतापर्यंत अतिक्रमण हटवून घेतले नाही. महानगरपालिकेने पाठविलेल्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले आहे. सदर मालकाने रस्त्याची जागा हडप करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण केले असताना देखील महानगरपालिकेने याबाबत कोणतीच कठोर कारवाई केली नाही. केवळ नोटिसा बजावून जबाबदारी झटकण्याचा प्रकार चालविला आहे. याबाबत पुन्हा तक्रार केल्यानंतर महापालिका कायदा 1976 च्या कलम 288 डी नुसार अतिक्रमण केलेल्या भूखंडधारकाला दि. 23 जून 2020 रोजी नोटीस बजावली आहे. तसेच 22 जुलै पर्यंत कागदपत्रे हजर करावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पण सदर मालकाने अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असताना कागदपत्रे हजर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याची गरज काय, असा मुद्दा मन्सूर मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे. सदर कारवाई करण्यास मनपाचे अधिकारी अपयशी ठरले असून कायद्याच्या चौकटीत ही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

Related Stories

अनगोळ-वडगाव मार्गावरील धोकादायक फांद्या हटवा

Amit Kulkarni

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर गुन्हा

Patil_p

लसीकरणास चालना देण्यासाठी लोकमान्य आरोग्य सन्मान योजनेस प्रारंभ

Amit Kulkarni

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

Omkar B

फळ विकणाऱया महिलेवर ऍसिड हल्ला

Patil_p

शेतकऱयांच्या आंदोलनाला येथील शेतकऱयांनी दिला पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!