Tarun Bharat

रेशनकार्डसाठी आधारकार्ड दुरुस्तीला वेग

प्रतिनिधी /बेळगाव

बीपीएल रेशनकार्ड कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आधारकार्ड दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी नागरिकांची धडपड दिसून येत आहे. कर्नाटक वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नावात बदल, पत्त्यात बदल, जन्म तारीख व मोबाईल क्रमांकामध्ये बदल आदी दुरुस्ती केल्या जात आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र बऱयाच लाभार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रथमतः आधारकार्डमधील चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. शासकीय योजना आणि इतर ठिकाणी आधारकार्ड आवश्यक आहे. मात्र बऱयाच नागरिकांच्या आधारकार्डवर मोबाईल क्रमांक नाही. तर काहींच्या नावामध्ये चुका आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अर्ज करताना अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील आझमनगर, गोवावेस, टीव्ही सेंटर, रिसालदार गल्ली आदी ठिकाणी असलेल्या कर्नाटक वन कार्यालयात दुरुस्तीसाठी नागरिकांची वर्दळ वाढत आहे.

अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन पुरवठय़ात पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसीचा अवलंब केला आहे. ई-केवायसी करताना आधारकार्ड गरजेचे आहे. त्यामुळे आधारकार्डावरील मजकूर बिनचूक असणे आवश्यक आहे. मात्र अनेकांच्या आधारकार्डमध्ये चुका असल्याने ई-केवायसीवेळी अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रथमतः आधारकार्ड दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.

Related Stories

कै. एल. आय. पाटील यांना श्रध्दांजली

Patil_p

बकरी ठेवण्याच्या शेडला भाडेकरू मिळणार का?

Patil_p

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करा

Omkar B

बापट गल्ली कारपार्किंगमध्ये कचऱयाचे ढिगारे

Patil_p

बेळगाव-बेंगळूर महामार्गावर होणार 60 ते 70 चार्जिंग स्टेशन्स

Amit Kulkarni

सदाशिवनगर येथील नाल्याचे बांधकाम त्वरित करा

Amit Kulkarni