Tarun Bharat

रेशनिंग हवे; मग कोविड टेस्ट करा…

प्रतिनिधी / नागठाणे : 

सातारा तालुक्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाय म्हणून टेस्टिंगचे प्रमाण वाढवा अशा सूचना प्रशासनाकडून सर्वच विभागाला देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने नागठाणे (ता.सातारा) येथे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य, महसूल, बोरगाव पोलीस व ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘रेशनिंग हवे….तर आधी टेस्ट करा’ अशी मोहीम सध्या राबवण्यात आली आहे.         

गेल्या काही दिवसांपासून येथील सर्व विभागांनी एकत्रित येऊन कोविड टेस्टिंगसाठी फिरती पथके तयार केली आहेत. या पथकांकडून नागठाणे गावात विविध ठिकाणी एकाचवेळी टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विनाकारण बाहेर फिरणारे तसेच परगावावरून भागात येणाऱ्या प्रवाशांच्या टेस्टिंग सुरवातीला करण्यास सुरुवात केलीय. त्यातच अनलॉक झाल्याने या पथकांनी येथील सर्वच व्यापाऱ्यांचीही कोविड टेस्ट केली. सध्या दिवसाला 150 अँटिजेन टेस्ट व जवळपास 35 आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत.          

सध्या नागठाणे ग्रामस्थांना देण्यासाठी रेशनिंग येथील रास्त भाव धान्य दुकानात आले आहे. या धान्याचे वाटप करताना ग्राहकांनाही अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रेशनिंग घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची येथील मारुती मंदिरात अँटिजेन टेस्ट करण्यास कालपासून सुरवात केली आहे. टेस्ट केल्याशिवाय रेशनिंग मिळत नसल्याने ग्राहकांना कोणताच पर्याय राहिला नसल्याने पहिले टेस्टिंगसाठी रांग आणि त्यानंतर रेशन घेण्याची रांग लावावी लागत आहे. त्यामुळे ‘रेशनिंग हवे….तर टेस्ट करा’ असा माहोल सध्या नागठाणे गावात तयार झाला आहे.

Related Stories

काहींचा मेंदू खोटा, राज्यापालांबाबत गप्प बसणारे दोषी, उदयनराजे संतापले

Rahul Gadkar

वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळकेला रौप्य

Archana Banage

कराडला 14 टक्के लसीकरण पूर्ण

Amit Kulkarni

प्रतापगडमध्ये संस्थापक पॅनेलचा एकतर्फी विजय

Patil_p

सातारा जिल्ह्यातील 346 कोरोना बाधित ; तर 9 मृत्यू

Archana Banage

सातारा : नर्सेस संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

Archana Banage