Tarun Bharat

रॉन क्लेन होणार व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ

बायडेन यांच्याकडून नियुक्ती : दोघांमध्ये 31 वर्षांपासून मैत्रीसंबंध

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणाऱया ज्यो बायडेन यांनी रॉन क्लेन यांना चीफ ऑफ व्हाइट हाउसपदी नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. 59 वर्षीय क्लेन यांना कट्टर डेमोक्रेट आणि कठोर प्रशासक मानले जाते. बायडेन आणि क्लेन यांच्यातील मैत्री 31 वर्षे जुनी आहे. बायडेन आणि नियोजित उपाध्यक्षा कमला हॅरिस सद्यकाळात डेलावेयरच्या कॅम्प ऑफिसमध्ये स्वतःची टीम तयार करत आहेत. यात दोघांचे सल्लागारही सामील आहेत.

रॉन क्लेन यांना अमेरिकतील नामांकित वकिलांपैकी एक मानले जाते. ते बराक ओबामा यांच्या टीममध्ये कार्यरत राहिले आहेत. ओबामांच्या कार्यकाळात बायडेन हे उपाध्यक्ष होते, तसेच क्लेन यांना त्यांचे विशेष सहकारी म्हणून नेमण्यात आले होते. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अनेकदा क्लेन यांनी ट्विटरवर कोंडी केली होती. कोरोना महामारीच्या मुद्दय़ावर ट्रम्प प्रशासनाला घेरण्याची रणनीती क्लेन यांनीच तयार केली होती, असे मानले जाते. ओबामा यांच्या कार्यकाळात इबोला विषाणूला रोखण्याची रणनीती तयार करण्यात क्लेन यांची महत्त्वाची भूमिका होती.

अमूल्य सहकारी

रॉन हे अमूल्य सहकारी आहेत, असे बायडेन यांनी म्हटले आहेत. 2009चे आर्थिक संकट व 2014 मध्ये इबोला विषाणूला रोखण्यात क्लेन यांची उल्लेखनीय भूमिका होती. क्लेन हे सर्वच राजकीय पक्षांशी मधूर संबंध ठेवून आहेत. अवघड काळात कशाप्रकारे काम केले जावे हे क्लेन यांना चांगलेच ज्ञात असल्याचे बायडेन म्हणाले.

बायडेन यांचे दीर्घकालीन सहकारी

1989 मध्ये बायडेन डेलावेयरचे सिनेटर असताना क्लेन यांनी हॉवर्ड लॉ स्कुलमधून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर ते बायडेन यांच्याशी जोडले गेले आणि आतापर्यंत दोघेही एकत्रितपणे काम करत आहेत. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात क्लेन यांना मोठा आदर प्राप्त आहे.

Related Stories

चालू आठवडय़ात श्रीलंकेकडून 54 भारतीय मच्छिमारांची सुटका

Patil_p

ज्युलियन असांजचे होणार अमेरिकेकडे प्रत्यार्पण

Patil_p

उत्तर कोरियावर भडकला जपान

Amit Kulkarni

टायर्सच्या मोठय़ा साठय़ाला आग

Patil_p

प्रत्येक 5 कैद्यांपैकी एक संक्रमित

Patil_p

हंगेरीमध्ये आणीबाणी लागू

Patil_p
error: Content is protected !!