Tarun Bharat

रॉबर्टो ऍग्युट विजेता

वृत्तसंस्था/ किजब्युहेल (ऑस्ट्रिया)

एटीपी टूरवरील शनिवारी येथे झालेल्या किझब्युहेल क्ले कोर्ट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत 34 वर्षीय रॉबर्टो ऍगटने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या मिसोलिकचा पराभव केला.

एकेरीच्या अंतिम सामन्यात 20 व्या मानांकित ऍगटने मिसोलिकचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ऍगटचे एटीपी टूरवरील हे 11 वे विजेतेपद आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या मिसोलिकने शुक्रवारी सुमारे अडीच तास चाललेल्या उपांत्य सामन्यात यानिक हेनफेमेनचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. 2022 च्या टेनिस हंगामातील ऍगटचे हे दुसरे जेतेपद आहे.

Related Stories

सूर्यकुमार यादव मानांकनात दुसऱया स्थानी

Amit Kulkarni

लॉक डाऊनच्या काळात धोनी, अश्विनकडून ऑनलाईन प्रशिक्षण

prashant_c

स्पेनचा नदाल एकेरीच्या अंतिम फेरीत

Omkar B

विनोद कांबळी आर्थिक अडचणीत!

Patil_p

अबु धाबी टी-10 स्पर्धेत गेल, आफ्रिदी, ब्रॅव्होचा समावेश

Patil_p

टॉप सीडेड जोकोविचला पराभवाचा धक्का

Patil_p