Tarun Bharat

रॉयल इनफिल्डने मागवल्या 2 लाखाहून अधिक गाडय़ा

Advertisements

नवी दिल्ली

 रॉयल इनफिल्डने आपल्या जवळपास 2 लाखाहून अधिक दुचाकी दोषाच्या कारणास्तव परत मागवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने 2 लाख 36 हजार 966 दुचाक्या पुन्हा मागवल्या आहेत. सदरच्या गाडय़ांमध्ये इग्नीशन कॉइलमध्ये दोष असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. क्लासिक, बुलेट आणि मीटीओर या दोषयुक्त गाडय़ा परत कंपनीने मागवल्या आहेत. डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 पर्यंतच्या कालावधीत तयार करण्यात आलेल्या मीटीओर आणि जानेवारी ते एप्रिल 2021 च्या कालावधीत निर्मिती आणि विक्री केलेल्या क्लासिक व बुलेट या गाडय़ा परत मागवण्यात आल्या असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Related Stories

बाऊन्स इनफिनिटीची इलेक्ट्रिक स्कूटर डिसेंबरमध्ये येणार

Patil_p

किया कॅरेन्स बाजारात दाखल

Patil_p

मारुतीची नवी आल्टो के 10 लाँच

Amit Kulkarni

महिंद्रा एक्सयूव्ही 700ला मिळाले फाईव्ह स्टार रेटिंग

Amit Kulkarni

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन बाजारात दाखल

Patil_p

बाऊन्स स्कूटर वितरण 18 एप्रिलपासून

Patil_p
error: Content is protected !!