Tarun Bharat

रोजंदारी कर्मचार्‍यांबाबत होणार निर्णय

प्रतिनिधी / कोल्हापूर

एसटीचे विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. बुधवारी रोंजदार कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचा आदेश निघण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर हे रोजंदार कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांना सेवामुक्तीच्या नोटीसा निघण्याचे संकेत आहेत. कोल्हापूर आगारामध्ये अशा 46 कर्मंचार्‍यांचा समावेश आहे.

एसटी संपामुळे कोल्हापूर आगारातील कर्मचारी संपामध्ये उतरले आहेत. बुधवार हा संपाचा 10 वा दिवस असून देखील यातून कोणताच तोडगा निघालेला नाही. कर्मचारी एसटीच्या विलिनीकरणावर ठाम आहेत. यामुळे कोल्हापूर आगारातील 53 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

बुधवारपासून रोजंदारीवरील डेली वेजीस व टेंपररी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचा आदेश काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये गट क्रमांक एक मधील डेली वेजीस व गट क्रमांक दोन मधील टेंपररी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या नोटीसा काढण्याच्या हालचाली सुरू असून, यामध्ये चालक व वाहकांचा समावेश आहे. बुधवारी तसा आदेश काढल्यास या चालक व वाहकांना कामावर हजर होणे बंधनकारक आहे. जर ते कामावर हजर न झाल्यास त्यांना सेवामुक्तीच्या नोटीसा निघणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; खोची बंधारा पाण्याखाली

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावातील युवक कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कोगे येथे गोठ्यास आग लागून लाखोंचे नुकसान

Archana Banage

विकास आघडीच्या अभ्यासमंडळाची यादी अंतिम

Archana Banage

सिंगल युज प्लॉस्टिक; साठवणूक, विक्रीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून कबनुरात तरुणाचा खून

Archana Banage