Tarun Bharat

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचा वर्धापनदिन

उच्च प्राथमिक मराठी शाळा जाफरवाडीला डेस्क, 15 भाजी विक्रेत्यांना मोफत हातगाडीचे वाटप

प्रतिनिधी /बेळगाव

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचा 32 वा वर्धापनदिन अध्यक्ष अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली रामनाथ मंगल कार्यालय येथे साजरा झाला. यानिमित्त उच्च प्राथमिक मराठी शाळा जाफरवाडीला डेस्क देण्यात आले, तर सायंकाळी रामनाथ मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात 15 भाजी विपेत्यांना मोफत हातगाडी देण्यात आली.

अशोक नाईक यांनी प्रास्ताविक केले. सचिव संतोष हत्तर्की यांनी वर्षभरातील कामाचा आढावा घेतला. नियोजित प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी 32 वर्षांतील क्लबच्या कार्याचा आढावा घेतला.

रोटरी क्लब साऊथची प्रशंसा

प्रमुख पाहुणे रोटे. विक्रम जैन यांनी रोटरी क्लब साऊथच्या कामाची प्रशंसा केली. पुढील काळात 500 महिलांना रोटरीतर्फे शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन धनश्री कुलकर्णी यांनी केले.
रमेश रामगुरवाडी यांनी आभार मानले.

Related Stories

गणेश दूध संकलन केंद्रातर्फे महिलांचा गौरव

Amit Kulkarni

पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेटस् हटविणार कधी?

Amit Kulkarni

शहर प्रवेशद्वारावरील पथदीप दिवसा सुरू अन् रात्री बंद!

Amit Kulkarni

11 जानेवारी रोजी बुडाला टाळे ठोकणार

Patil_p

ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची. घरज

Amit Kulkarni

नागरिकांनी जाब विचारताच आली जाग

Amit Kulkarni