Tarun Bharat

रोटरी क्लब क़डून डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पीपीई किटचे वाटप

प्रतिनिधी / शिरोळ

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आवश्यक असणार्‍या पीपीई किटची गरज लक्षात घेवून येथील रोटरी क्लब शिरोळ यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय, शिरोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाड आणि शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याठिकाणी मोफत किटचे वाटप करण्यात आले. शिरोळ रोटरी क्लबचे अध्यक्ष पंडीत काळे, यांच्यासह उपस्थित डॉक्टरांनी कर्मचार्‍यांना पीपीई किट देण्यात आले.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष पंडीत काळे म्हणाले की, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पीपीई किट आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेवूनच तात्काळ रोटरी क्लबच्या सदस्यांची बैठक घेवून शिरोळातील डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव व तालुका वैद्यकीय अधिकारी पी.एस. दातार यांनीही शिरोळ रोटरी क्लबने पीपीई किट उपलब्ध करून दिल्यामुळे डॉक्टरांना सुरक्षितपणे कोरोना रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. व त्यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विशाल चौगुले बोलताना म्हणाले की, देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाचा सामना करण्याकरिता शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ६ बेडचा आयसोलेशन विभाग सुसज्ज ठेवण्यात आला आहे. २४ तास याठिकाणी आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी आम्ही शासनाकडे पीपीई किटची मागणी केली होती. मात्र अद्याप शासनाकडून किट उपलब्ध झाले नव्हते. पण डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लबने किट उपलब्ध करून देवून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी येथील डॉक्टरांना पाठबळ दिले आहे. असे सांगून त्यांनी रोटरीच्या कार्याचे कौतुक केले.

Related Stories

पोलीस हतबल, राज्य सरकारच्या सांगण्यावरून कारवाई : जितेंद्र आव्हाड

Archana Banage

मुरगुड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर चप्पल फेक; पालिका कार्यालयात राडा

Archana Banage

कुरुंदवाडात धार्मिक एकात्मतेची वीण घट्ट, मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना

Archana Banage

सातारा जिल्ह्यात 196 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यू

Archana Banage

सदरबाजारमधील अवैध व्यवसायिकांवर कारवाई करा

Patil_p

“भोगावती अँप”चा आजपर्यंत काहीच खर्च नाही

Archana Banage