Tarun Bharat

रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातील सर्वात महागडी बुगाटी सेंटोडीएसी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 75 कोटी रुपये आहे. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

बुगाटीने सेंटोडीएसी या केवळ 10 कार बनवल्या आहेत. ही कार 380 किमी प्रति तास वेग पकडते. 2.4 सेकंदात ही कार 60 किमी प्रति तास वेग पडकते. रोनाल्डोने नुकतेच 36 वे पर्व असलेले Serie A या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकल्यावर त्याने ही कार खरेदी केली आहे. रोनाल्डोला या गाडीसाठी 2021 हे नवीन वर्ष येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

रोनाल्डोकडे 264 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या कार आहेत. स्पोर्ट्सवेअर ब्रँड बुगाटी आणि ऑटोमोबाईल ब्रँड नाईकी यांनी मिळून रोनाल्डोसाठी एक विशिष्ट बूट देखील बनवला आहे. ‘Mercurial Superfly VII CR7’ या बूटचे नाव आहे. 

Related Stories

किया कॅरेन्स बाजारात दाखल

Patil_p

जमिनीच्या आत वसलेले अनोखे गाव

Patil_p

ब्रिटिश खासदाराचा मारेकरी दहशतवादी असल्याचे निष्पन्न

Patil_p

बगदादमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट, १० जणांचा मृत्यू

Archana Banage

युक्रेनमधील 79 वर्षीय ‘शूटर आजी’

Patil_p

2035 पर्यंत 67.5 कोटी होणार शहरी लोकसंख्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!