Tarun Bharat

रोहित कसोटी कर्णधार, रहाणे-पुजाराला डच्चू

Advertisements

श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवले गेले असून अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना डच्चू देण्यात आला आहे. रहाणे व पुजारा प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये राहिले आहेत. तूर्तास, उभयतांना रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना करण्यात आल्याचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी जाहीर केले.

अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व दिग्गज जलद गोलंदाज इशांत शर्मा यांनाही कसोटी संघातून वगळले गेले. श्रीलंकेविरुद्ध दौऱयाची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होत असून त्यानंतर दि. 4 मार्चपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 18 सदस्यीय संघात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार हा एकमेव नवा चेहरा समाविष्ट आहे.

टी-20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विराट कोहली व रिषभ पंत यांना विश्रांती दिली. शिवाय, शार्दुल ठाकुरला लंकेविरुद्ध पूर्ण मालिकेतून विश्रांती देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदर व केएल राहुल हे देखील संघात समाविष्ट नसतील, हे स्पष्ट झाले. रविचंद्रन अश्विनची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. अक्षर पटेल अद्याप दुखापतीतून सावरत असून दुसऱया कसोटीसाठी तो उपलब्ध होईल, असा होरा आहे.

भारतीय कसोटी संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियंक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

भारतीय टी-20 संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अवेश खान.

Related Stories

एएफसी चॅम्पियन्स लीगचे पूर्व विभागीय सामने आता कतारमध्ये

Patil_p

इंग्लिश फुटबॉल स्पर्धा जूनमध्ये सुरू करण्याचे संकेत

Patil_p

दुसऱया सामन्यातही भारताची जर्मनीवर मात

Patil_p

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ; सुर्यकुमार, क्रुणाल व कृष्णाला संधी

Archana Banage

ओडिशा एफसी संघाचा ऑनवेयुशी करार

Patil_p

न्यूझीलंड दौऱयाचा विजयी श्रीगणेशा

Patil_p
error: Content is protected !!