Tarun Bharat

रोहित शर्माला वगळल्याचे गूढ!

रोहित शर्माला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळले गेल्याचे निमित्त झाले आणि या निमित्ताने मुंबई इंडियन्स व बीसीसीआय यांच्यातील शीतयुद्धाचीच जणू झलक दिसून येत असल्याची चर्चा आहे. दि. 18 ऑक्टोबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यादरम्यान डाव्या पायाला धोंडशिरेची दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मा पुढील सलग दोन सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करु शकला नाही. पण, या एकाच कारणामुळे रोहितला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळले गेले का, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा जलद गोलंदाज इशांत शर्मा हा दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर फेकला गेला होता. त्याचाही ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी समावेश केला गेला नाही. पण, रोहित शर्माला वगळले जाणे अधिक चर्चेचा विषय ठरले आहे.

इशांत असो किंवा रोहित, त्यांच्या दुखापतीविषयी अधिक तपशील किंवा त्यांना यातून सावरण्यासाठी किती वेळ लागेल, याचा तपशील न देता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी या उभयतांच्या प्रगतीवर बीसीसीआय वैद्यकीय पथकाचे लक्ष असेल, इतकेच नमूद केले. त्यामुळे, एकंदरीत निवडीतील निर्णयाविषयी गूढ निर्माण झाले आहे.

Related Stories

इंग्लिश कौंटी स्पर्धेसाठी दोन विदेशी खेळाडूंना परवानगी

Patil_p

हॅलेप, स्वायटेक यांची विजयी सलामी

Patil_p

खेळपट्टीच्या टीकाकारांवर रिचर्ड्सची टीका

Patil_p

जोकोविचकडून फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

Patil_p

ऑलिम्पिकसाठी पांघलला टॉप सिडिंग

Patil_p

दुखापतीमुळे शिवा थापा रौप्यपदक

Patil_p