Tarun Bharat

र. धों. कर्वे यांच्या जीवनकार्यावरील ‘एकटा’ पुस्तकाचे आज प्रकाशन

युवा लेखक उमेश सूर्यवंशी यांची साहित्यकृती

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

बहुजन नायक र. धों. कर्वे यांच्या जीवनकार्य, विचारदर्शनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱया एकटा या पुस्तकाचे प्रकाशन आज रविवारी सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. शाहू आणि गांधी विचाराचे अभ्यासक असणाऱया युवा लेखक उमेश सूर्यवंशी यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

अंनिवा आणि समाजस्वास्थ्य मासिकाचे माजी संपादक सांगलीच्या डॉ. प्रदीप पाटील यांच्या हस्ते आणि आटपाडीचे आर. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा होणार असून या यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उमेश सूर्यवंशी आणि त्यांच्या मित्र परिवाराने केले आहे. राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधीजींच्या विचाराचे अभ्यासक असणाऱया उमेश सूर्यवंशी यांनी असंख्य व्याख्याने शाळा आणि महाविद्यालयात दिली आहेत. राजर्षी या शाहू महाराजांच्या जीवनावरील शब्द आणि चित्ररूप पुस्तकाचे संपादन केले आहे. महात्मा गांधींजींवर निर्भय पुस्तकही लिहले आहे. त्याचबरोबर त्यांची इतर अनेक विचार देणारी पुस्तके आणि पुस्तिकाही प्रकाशित झाल्या आहेत.

Related Stories

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 16782 वर

Rohan_P

Tokyo Olympics : टेबल टेनिस- मनिका बत्राचा शानदार विजय

Abhijeet Shinde

खासगी क्षेत्रात रोजगारांच्या संधी

Abhijeet Shinde

ठकसेनांची जप्त मालमत्ता बँक-सरकारजमा

Patil_p

सप्ताहभरात वेतनाची ग्वाही, आठ तासांनंतर कंत्राटी डॉक्टर कामावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!