Tarun Bharat

लंका-हॉलंड यांच्यात आज शेवटचा पात्रता सामना

Advertisements

वृत्तसंस्था /शारजाह

आयसीसीच्या येथे शनिवारपासून सुरू होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 12 संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्रता फेरीतील शेवटचे सामने खेळवले जाणार आहेत. शुक्रवारी येथे लंका आणि हॉलंड यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. लंकन संघाने यापूर्वीच सुपर 12 संघामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही औपचारिक लढत आहे.

लंकन क्रिकेट संघाने पात्र फेरीच्या स्पर्धेतील सामन्यात नामिबिया आणि आयर्लंड यांचा पराभव करत सुपर 12 संघांतील आपले स्थान निश्चित केले. लंकन संघातील कुशल परेरा आणि दिनेश चंडीमल फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. या दोन्ही फलंदाजांना सूर मिळविण्याची शेवटची संधी शुक्रवारच्या सामन्यात राहील.

लंकन संघातील गोलंदाज करूणारत्ने, चमिरा, हसरंगा तसेच अकिला धनंजय यांना गोलंदाजीत दर्जेदार कामगिरी करावी लागेल. अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्षे यांच्या फलंदाजीत सुधारणा होणे जरूरीचे आहे. पात्र फेरीच्या या शेवटच्या सामन्यात हॉलंडचा संघ लंकेविरूद्ध कडवी लढत देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र हॉलंड संघाचे पात्रतेचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.

Related Stories

जसप्रित बुमराहचा कसून सराव

Patil_p

जम्मू व काश्मीरविरुद्ध कर्नाटक मजबूत स्थितीत

Patil_p

सुकांत कदमला बॅडमिंटनमध्ये रौप्य

Patil_p

चेन्नईकडून दिल्लीचा 91 धावांनी धुव्वा,

Patil_p

दमदार विजयासह भारताची मालिकेत बरोबरी!

Patil_p

आरसीबीच्या पदरी अपयशाचा ‘वनवास’!

Patil_p
error: Content is protected !!