Tarun Bharat

लंकेचा सलामीचा सामना आज बांगलादेशविरुद्ध

वृत्तसंस्था/ शारजा

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी लंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला येथे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार आहे. गट-1 मधील हा पहिला सामना आहे.

लंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी पात्र फेरीची स्पर्धा पार करत सुपर 12 संघांमध्ये स्थान मिळविले आहे. पात्र फेरीच्या अ गटात लंकेने 3 सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले तर ब गटात बांगलादेशने दुसरे स्थान पटकाविले. या गटात स्कॉटलंड पहिल्या स्थानावर राहिला. पात्र फेरीच्या शेवटच्या सामन्यात लंकेने नामिबियाचा 7 गडय़ांनी पराभव केला तसेच लंकेने आयर्लंडवर 70 धावांनी मात केली. लंकेने गटात हॉलंडचा 8 गडय़ांनी पराभव केला.

बांगलादेश संघाला पात्र फेरीच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडकडून पराभवाचा धक्का बसला. पण, त्यानंतर बांगलादेशने ओमान आणि पापुआ न्यू गिनिया यांचा पराभव करत सुपर 12 संघांत स्थान मिळविले.

रविवारच्या सामन्यात लंकन संघाला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. लंकेच्या तुलनेत बांगलादेशची गोलंदाजी थोडी अधिक भक्कम वाटते. बांगलादेश संघाने 2021 क्रिकेट हंगामात टी-20 चे नऊ सामने जिंकून विश्वचषक टी-20 स्पर्धेत प्रवेश केला आहे. लंकेचे नेतृत्व शनाकाकडे तर बांगलादेश नेतृत्व मेहमुदुल्लाकडे आहे.

Related Stories

फ्रान्सचा फुटबॉलपटू मेटुडी निवृत्त

Patil_p

प्रीती-शिल्पाच्या संघात आज चुरस

Patil_p

इब्राहिमोव्हिक, लुकाकू यांना दंड

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 118 धावात खुर्दा

Patil_p

टी-20 फलंदाजांच्या मानांकनात सूर्यकुमार यादवचे अग्रस्थान भक्कम

Patil_p

न्यूझीलंडला फलंदाजीतील खराब फॉर्मची चिंता

Patil_p