Tarun Bharat

लंकेचे विंडीजला 375 धावांचे आव्हान

Advertisements

वृत्तसंस्था / अँटीग्वा

पथुम निसांकाच्या पदार्पणातील झळकविलेल्या शानदार शतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेने विंडीजला निर्णायक विजयासाठी 375 धावांचे आव्हान दिले असून विंडीजने दुसऱया डावात 1 बाद 34 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या दिवशी विंडीजला विजयासाठी 341 धावांची जरूरी असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत. कसोटी पदार्पणात लंकेच्या निसांकाने 103 धावा झळविताना डिक्वेला समवेत 179 धावांची भागिदारी केली.

या कसोटीत लंकेचा पहिला डाव 169 धावांत आटोपल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 271 धावा जमवित 102 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱया डावात लंकेने दमदार फलंदाजी करत 476 धावांचा डोंगर उभा केला. खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेचा धनंजय डिसिल्वा जोसेफच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकांतील पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. डिसिल्वाने 79 चेंडूत 10 चौकारांसह 50 धावा जमविल्या.

Related Stories

यंदा आयपीएलमध्ये अमेरिकन खेळाडूची ‘एन्ट्री’!

Patil_p

लंकेकडून विंडीजचा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश

Patil_p

मिराबाई चानू भारताची एकमेव वेटलिफ्टर

Patil_p

भारत अ च्या विजयामध्ये, शॉचे अर्धशतक, कुलदीपची हॅट्ट्रीक

Patil_p

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘रणजी’ला आजपासून प्रारंभ

Patil_p

द. आफ्रिका दौऱयाची हमी दिलेली नाही : बीसीसीआय

Patil_p
error: Content is protected !!