Tarun Bharat

लंडन येथे टिकटॉकचे मुख्यालय ?

Advertisements

वृत्तसंस्था/ बीजिंग

सोशल क्हीडीओ प्लॅटफार्म टिकटॉकने चिनसोबतचे संबंध तोडले आहेत.यामुळे   टिकटॉक आता आपले नवीन मुख्यालय लंडन येथे उभारण्याची तयारी करत असल्याचे संकेत आहेत. यासंदर्भात ब्रिटनच्या सरकारसोबत टिकटॉकची चर्चा सुरु असल्याची माहिती रॉयटर्सच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.

चीनसोबत संबंध तोडल्यामुळे टिकटॉकने हा पर्याय निवडला आहे. चीनसोबतचे संबंध बिघडले असल्याने टिकटॉकला भारतासोबत अन्य देशांमध्ये प्रतिबंधाचा सामना करावा लागत आहे. परंतु आता स्थिरस्थावर होण्यासाठी टिकटॉक नवीन रणनीती स्विकारत आहे.

कंपनीने मागील काही आठवडय़ात अमेरिकेवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. परंतु नवीन मुख्यालयासाठी लंडनचा विचार सुरु आहे. यामध्ये आपल्या कार्याचा विस्तार वाढविण्यासाठी प्रमुख ठिकाणांचा विचार येत्या काळात करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अन्य शहरांचा विचार

नवीन मुख्यालय उभारण्यासाठी टिकटॉक लंडनसोबत अन्य शहरांची नावे चर्चेत असून त्यावर विचार केला जात आहे. परंतु टिकटॉककडून चालू वर्षात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाला पसंती दर्शवली जात आहे. यात वॉल्ट डिझ्नेच्या पूर्वचे सहाय्यक अधिकारी पाउचिंग केविन मेयर यांच्या नावाचाही समावेश आहे.

चीनच्या ऍपना बंदी

भारत-चीन यांच्यातील सीमेवरील संघर्षामुळे भारताने कठोर निर्णय घेत चिनचे तब्बल 59 ऍप बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे टिकटॉक, वीचॅटसह अन्य मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहेत.

Related Stories

भारताचे लवकरच स्वत:चे ऍप स्टोर

Patil_p

देशातील मोबाईल कॉलिंग सुविधेला 25 वर्षे पूर्ण

Patil_p

जेफ बेझोस ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती

Amit Kulkarni

चीनकडून अलिबाबावर मोठी दंड आकारणी

Patil_p

रिलायन्सने हवाई इंधन स्टेशन्स वाढविली

Patil_p

सेन्सेक्सची तेजीची घोडदौड सुरुच

Patil_p
error: Content is protected !!