Tarun Bharat

लऊळ शिवारातील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यातील लऊळ शिवारात शिराळ रस्त्यावरील चवसी वस्तीनजीक आढळेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात कुर्डुवाडी पोलिसांना यश आले आहे. संबंधीत मृतदेह हा बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद सुरेश घुगे यांचा असून ते मंगळवार पासून बेपत्ता होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी सव्वा अकराच्या सुमारास लऊळ शिवारात दुर्गंधी सुटलेला जळालेला मृतदेह असल्याची खबर लऊळ येथील पोलिस पाटील चंद्रकांत लोकरे यांनी कुर्डुवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर कुर्डुवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. मृताच्या अंगावर अनेक वार झाले असल्याचे दिसून आल्याने हा खून असून पुरावे नष्ट करण्याच्या हेतून तो मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना दिसून आले.

मृताचा चेहरा व शरीर जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे मृताची ओळख पटवणे पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक होते. परंतू, मृताच्या डाव्या हाताच्या अंगठा व करंगळी मधील तीन बोटे नव्हती एवढीच खूण मृताची ओळख पटवण्यासाठी होती. या खुणेवरुनच मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मृताच्या नातेवाईकांनी कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. हा खून कोणी व कशासाठी केला असेल याचा शोध कुर्डुवाडी पोलिस घेत आहेत.

Related Stories

सोलापूर शहरात 40 कोरोना पॉझिटिव्ह,दोन रुग्णांचा मृत्यू

Archana Banage

पत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल

Archana Banage

सोलापूर : मॉल्स,मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू ठेवण्यास परवानगी

Archana Banage

नर्सेसच्या आंदोलनामुळे प्र. अधिष्ठातांना सक्तीच्या रजेचा अर्ज मागे घेण्याची ओढावली नामुष्की

Archana Banage

आयशर टेम्पो अडवून चोरट्यांनी लुटला ९८ हजारांचा माल

Archana Banage

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यावधी युवक बेकार

Archana Banage