Tarun Bharat

लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

-वांझोळेतील अपघात, लक्झरी चालकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ देवरुख

देवरुख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे लक्झरीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार 6 मे रोजी सकाळी 7.45 च्या सुमारास घडले. या प्रकरणी लक्झरी चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची खबर वांझोळे येथील रिक्षाचालक दिनेश भिकू चव्हाण यांनी दिली. अपघातात रवींद्र शिवराम शिवगण जागीच ठार झाले आहेत. रितेश कदम (चरवेली ता. रत्नागिरी) आपल्या ताब्यातील लक्झरी (एमएच 04, जीपी 1299) घेऊन देवरुखहून साखरप्याच्या दिशेने जात होता. रवींद्र शिवगण आपल्या ताब्यातील दुचाकीने (एमएच 01, आरए 2244) वांझोळेहून देवरुखच्या दिशेने येत होते. वांझोळे येथील अवघड वळणावर रितेश कदमचे लक्झरीवरील नियंत्रण सुटल्याने रवींद्र शिवगण यांना जोराची धडक बसली. अपघातात रवींद्र शिवगण मागच्या चाकाखाली सापडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे जमाव शांत

अपघातानंतर लक्झरी चालक फरार झाला होता. यामुळे ग्रामस्थ व शिवगण यांचे नातेवाईक आक्रमक झाले. पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे जमाव शांत झाला. फिर्यादीवरून रितेश कदम याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात रवींद्र शिवगण यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू, 17 नवे रुग्ण

Archana Banage

कार अपघातात युवा उद्योजक ठार

NIKHIL_N

राजापूर पंचायत समिती सभापती लाड यांचा राजीनामा

Archana Banage

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांना पुराचा फटका

Archana Banage

रत्नागिरी : संगमेश्वरात शिवसेनेच्यावतीने शासनाचा निषेध

Archana Banage

मराठमोळ्या पोशाखाचा अमेरीकेत गौरव

Anuja Kudatarkar