मुंबई : सन 2020 मध्ये ऑटोमोबाईल उद्योगाला यथातथाच प्रगती साधता आली आहे. लहान ते मध्यम गटातील कार्सना मागणी चांगली राहिली होती. पण सर्वात मोठा फटका बसला तो लक्झरी कार्सना. यंदा या लक्झरी कार्सच्या विक्रीत 40 टक्के इतकी घट झाल्याचे समोर आले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा मोठा फटका लक्झरी कार्सना बसला. उद्योगातील तज्ञांच्या मते 2020 च्या शेवटी लक्झरी कार्सच्या विक्रीची संख्या 20 ते 21 हजाराच्या घरात असेल. मागच्या वर्षी या तुलनेत विक्री 34 हजाराच्या घरात होती. सहा महिन्यामागे विक्रीची परिस्थिती फार नाजूक होती. पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे महिने मात्र विक्रीत आशा दाखवणारे ठरले.


previous post
next post